उत्तर महाराष्ट्रातील पहिले 'रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर' मेडिकव्हर हॉस्पिटल येथे सुरु

17th November, 2022      Medicover Hospitals    Maharashtra

MAHARASHTRA; 16th November 2022: नाशिक उत्तर महाराष्ट्रातील पहिले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचे उदघाटन नाशिकचे लोकप्रिय खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथे करण्यात आले. नाशिक जिल्ह्यासाठी हि एक गौरवाची बाब तर आहेच परंतु संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी हि अत्याधुनिक सुविधा आरोग्यदायी ठरेल असे प्रतिपादन त्यांनी या सोहळ्यात केले.

सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (TKR) आता नव्या युगाकडे वाटचाल करत आहे. शस्त्रक्रियेतील साहित्य, उपकरणे आणि तंत्रांमध्ये बर्याच सुधारणांमुळे या प्रक्रियेची परिणामकारकता खूप वाढली आहे. अचूक इम्प्लांट पोझिशनिंग आणि अलाइनमेंटच्या आव्हानांवर मात करण्यासाठी नाविन्यपूर्णतेची सतत गरज भासत असते. संगणकाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया नवोपक्रमाचा एक नवीन टप्पा सुरू केला आहे आणि जर आपण अलीकडील ट्रेंड आणि प्रगती तंत्रज्ञानाबद्दल बोलायचे झाल्यास रोबोटिक्सने वर्तमान आणि भविष्यासाठी नवा मार्ग दाखवला आहे. गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियांसाठी जगातील पहिला (CUVIS) हा स्वायत्त रोबोट आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक हे रुग्णांसाठी सर्वोतम शस्त्रक्रिया परिणाम देण्यासाठी या रूपाने सज्ज झाले आहे.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाविन्यपूर्ण आणि कार्यक्षम सेवांद्वारे प्रगत वैद्यकीय सेवेसाठी वचनबद्ध आहेच परंतु या अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या साह्याने परिणामकारक उपचार आता रुग्णांवर होणार आहे अशी माहिती मेडिकव्हर हॉस्पिटल समूहाचे चीफ ऑफ बिजनेस ऑपरेशन्स हेड महेश देगलूरकर यांनी दिली.

मॅन्युअल सर्जिकल प्रक्रियेच्या तुलनेत, रोबोटिक गुडघा बदलण्याचे बरेच फायदे आहेत रोबोटिक गुडघा बदलण्याचे चांगले इम्प्लॉट पोझिशनिंग, अचूक शस्त्रक्रिया हाड कापणे, कमीत कमी मानवी हस्तक्षेप, जलद पुर्नप्राप्ती आणि कमीत कमी हॉस्पिटलमध्ये राहणे असे बरेच फायदे असल्याचे आणि अत्याधुनिक रोबोटच्या साह्याने शस्त्रक्रिया विषयी सविस्तर माहिती सांधे विकार व सांधे बदल शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. सागर काकतकर यांनी दिली.

रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरचे उदघाटन सोहळ्याचे प्रास्ताविक मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशु व बालरोग तज्ञ डॉ सुशील पारख यांनी केले. या प्रसंगी अशोका समूहाचे चेअरमन अशोक कटारिया मेंदू व मणके विकार शस्त्रक्रिया तज्ञ डॉ शेखर . चिरमाडे सांधे विकार व सांधेप्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ञ डॉ सागर काकतकर, डॉ प्रणित सोनावणे, मार्केटिंग हेड पियुष नांदेडकर हे मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर यांनी केले. याप्रसंगी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी नाशिक शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष व पदाधिकारी तसेच रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.