बोन मॅरो ट्रान्सप्लांट


By Dr Nilesh Wasekar
Consultant Hemato - Oncologist

बोन मॅरो ट्रान्सप्लांट

  • बोनमॅरो हे मानवी हाडांच्या आतमध्ये असणारा एक विशिष्ट प्रकारचा घट्ट मऊ स्वरुपातील द्रव घटक असतो, ज्यास मगज असेही म्हटलं जातं. बोन मॅरोचं मुख्य कार्य म्हणजे शरीरात रक्त पेशी तयार करणे. यामध्ये शरीरासाठी रक्त निर्माण करणाऱ्या पेशींची निर्मिती होते.
  • आपल्या शरीरामध्ये लाल आणि पांढऱ्या पेशींपासून रक्त तयार होते. पण ब्लड कॅन्सरमध्ये या पेशींची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. या रोगामध्ये रक्तातील पांढऱ्या पेशींच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. यामुळे शरीराला पुरवठा होणाऱ्या रक्ताचेही कार्य बिघडते.
  • जेव्हा मगजामध्ये (Bone Marrow) एखादी अपरिपक्व रक्तपेशी तयार होऊन या पेशीनं रक्तामध्ये प्रवेश केल्यास रुग्णाच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

बोन मॅरो ट्रान्सप्लांट कोणत्या रुग्णांवर केली जाते?

रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया), लिम्फोमा (लिम्फॅटिक सिस्टमचा कर्करोग),मायलोमा (प्लाझ्मा पेशींचा कर्करोग), थॅलेसेमिया, सिकल सेल, मुलांसह प्रौढांमधील अप्लास्टिक अ‍ॅनेमिया, न्युरोजेनेटिक आजारासह सुमारे 70 प्रकारच्या दुर्धर आजारग्रस्त रुग्णांमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट होऊ शकते. या शस्त्रक्रियेसाठी भाऊ-बहीण, आई-वडील रुग्णाला बोन मॅरो देऊ शकतात. पण एचएलए (Human Leukocyte Antigen) मॅच झाल्यानंतर आणि संबंधित रुग्णावर किमोथेरपी किंवा अन्य उपचारांद्वारे रुग्णाची प्रकृती योग्य स्थितीत असतानाच हे प्रत्यारोपण केले जाते.

bone-marrow-transplant-in-marathi

ही शस्त्रक्रिया वेदनादायी असते का?

बोन मॅरो प्रत्यारोपणात ऑटोलोगस आणि अ‍ॅलोजेनिक असे दोन प्रकार आहेत. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाही. बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक अशी प्रक्रिया आहे जेथे रुग्णाला ठिबकाद्वारे (Drip) कीमोथेरपी (कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी) दिली जाते. पूर्वी हाडांमधून बोन मॅरो काढून त्याचे प्रत्यारोपण केल जायचे, जी प्रक्रिया वेदनादायी होती. अत्याधुनिक तंत्रानुसार दात्याला (Donor) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इंजेक्शन देऊन रक्ताद्वारे 'बोन मॅरो स्टेम सेल्स' काढल्या जातात आणि पुन्हा रक्त त्याच दात्याच्या शरीरामध्येही सोडले जाते.

​प्रत्यारोपणानंतर काय काळजी घ्यावी

ऑपरेशनपूर्वी आणि ऑपरेशननंतर रुग्णाला जवळपास सात ते आठ महिने उपचार द्यावे लागतात.

  • आजारपणामध्ये रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होणे, डोके दुखी, मळमळणे, श्वास घेताना त्रास होणे, ताप किंवा रक्तदाबाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
  • पण बोन मॅरो प्रत्यारोपण पार पडल्यानंतर संसर्ग होऊ नये, यासाठी रुग्णाची भरपूर काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्व प्रकारची स्वच्छता पाळणे आवश्यक आहे.
  • घर स्वच्छ ठेवा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
  • आहारामध्ये कच्च्या भाज्या, साखरयुक्त पदार्थ, मांस-मासे यांचे सेवन करणं टाळा.
  • ऑपरेशननंतर आपल्या आरोग्याची माहिती नियमितपणे डॉक्टरांना सांगणेही आवश्यक आहे

आमच्या तज्ञ डॉक्टरांशी भेटीची वेळ बुक करा!Get Your Queries Answered Now